पोस्ट्स

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

इमेज
 संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन    संगमनेर/ प्रति : हनुमान जन्मोत्सव निमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोष म्हणून वातावरणात हा उत्सव साजरा होत असतो यातच संगमनेर शहराच्या केंद्रबिंदूस्थानी असलेले संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते व त्याचबरोबर विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव सोहळा आनंद उत्सव पार पडत असतो या निमित्ताने आज सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  या शोभा यात्रेचे प्रारंभ संगमनेर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणावरून शोभायात्रेची सुरुवात होणारा असून ती शहरातील विविध भागांतून शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेचे निघणाऱ्या मार्गावरून सर्वच भाविक भक्त यानिमित्ताने स्वागत करीत असतात फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी इतर विविध प्रकारच्या प्रमुख आकर्षणांनी ही शोभायात्रा संपन्न होत असते. शोभायात्रा संगमनेर शहर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर येथून शोभाय...

पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद

इमेज
 पुणे/प्रति : पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.   “पत्रकार सुरक्षित तर लोकशाही मजबूत” हा संदेश देत ही चळवळ आता निर्णायक संघर्षाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. संघटनात्मक बांधणीतून पुण्यात आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची मोठी ताकद उभी राहिली आहे . देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेली ‘पत्रकार सुरक्षा परिषद’ अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक ठरली. पत्रकारांचे अधिकार, हक्क आणि बदलत्या मीडिया व्यवस्थेतील आव्हाने यांवर या परिषदेत सखोल मंथन करण्यात आले. राज्यभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभाग नोंदवत आपले...

स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले.

इमेज
 'स्व. कुसुमताई भीमराव पवार' यांचे वर्षश्रध्द ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तनाने संपन्न संगमनेर प्रति : "तू माऊली मवाळ, तू पाण्याहून पातळ..." या संतवचनाप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर वात्सल्याचा वर्षाव केला, अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मातोश्री स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तन सेवेने वर्षश्राद्धाचे विधी संपन्न झाले.       -----------रस्त्याचे नामकरण आणि श्रद्धांजली------------ एक वर्षापूर्वी कुसुमताईंचे निधन झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.  त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी गुंजाळवाडी येथील रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या नामकरण सोहळ्यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी कुसुमताईंच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि सामाजिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.       ----------भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा---------...

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा

इमेज
वडगाव पान येथील चिमुकली वरील ॲसिड हल्ला अत्यंत दुर्दैवी--डॉ. जयश्रीताई थोरात  संगमनेर प्रति : वडगाव पान येथील तेरा वर्षाची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावर अज्ञात इसमाने ॲसिड हल्ला केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असून या गुन्हेगाराचा तातडीने शोध लावून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करताना सरकारने महिलांच्या सुरक्षा बाबत प्राधान्याने कडक कायदे केले पाहिजे अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. वडगाव पान येथील लहान मुलीवर झालेल्या हल्ल्याची बातमी कळताच डॉ जयश्रीताई थोरात यांनी तातडीने तिची प्रवरा मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली याचबरोबर कुटुंबीयांना धीर दिला.  यानंतर या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्या संतप्त होऊन म्हणाल्या की झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे अवघ्या तेरा वर्षाच्या लहानग्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला होतो आहे हे किती वाईट आहे. ईश्वरीच्या  वडिलांचे निधन झालेले आहे .आई अत्यंत गरीब आहे. ही मुलगी मामाकडे राहते .शिक्षण घेते आणि असे असताना शाळा सुटल्यानंतर घरी जाताना रोड वरून कोणीतरी अज्ञ...

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

इमेज
संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव  संगमनेर प्रति: जगाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर आणि साहित्य कुंज मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यगाथा समाजासमोर मांडण्याचा हा मनस्वी प्रयत्न आहे. हा सन्मान सोहळा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णा गार्डन, मेडिकव्हर हॉस्पिटल जवळ, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी मा. अॅड. सौ. ज्योती मालपाणी (समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या) आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे (बीजसंवर्धन जननी) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क...

पेमगिरी शहागड संवर्धनासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करा

इमेज
आमदार अमोल खताळ यांची विधान सभेत जोरदार मागणी संगमनेर प्रति :संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड किल्ल्या च्या संवर्धनासाठी राज्य शासनाने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात यावा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली.  संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शहागडाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा,अशी मागणी करताना पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्या दुर्गाचे संवर्धन करावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करून या स्थळाला ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असेही त्यांनी सभागृहात स्पष...

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ

इमेज
२५ कोटी रस्त्यांसाठी, ६ कोटी म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी; वाहतूक सुधारणा व ग्रामीण विकासास चालना संगमनेर/ प्रति : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी २५ कोटी व वेल्हाळे ते राजापूर म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी असे एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच  अर्थ संकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे या निधीतून कोकणगाव ते मांची घाट, सुकेवाडी ते राष्ट्रीय महामार्ग ५० , चिंचेवाडी-साकूर, ते राष्ट्रीय महामार्ग ७१ ते मारुती मंदिर, अकोले नाका शारदा शाळा ते तीन बत्ती चौक, निमगाव बुद्रुक गाव, राजापूर तसेच जोर्वे नाका  ते निंबाळे चौफुली नान्नज दुमाला ते पारेगाव बुद्रुक, निमगाव टेंभी ते शिरापू...

राज्यसभेवर तिसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर रामदास आठवले भावूक

इमेज
शिर्डीचा खासदार होण्याची माझी तीव्र इच्छा : ना. रामदास आठवले शिर्डी:प्रति: राज्यसभेवर तिसऱ्यांदा वर्णी लागल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावर भाष्य करण्यासोबतच विविध राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली. "शिर्डीचा खासदार होण्याची माझी खूप इच्छा होती, मात्र आता मी राज्याचा (राज्यसभा) खासदार आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रामदास आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासामुळे मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. अशी संधी मिळणारा मी एकमेव खासदार असून, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. "एकेकाळी आमचे ९ खासदार होते, मात्र आता सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकतेचा आणि संविधानाचा संदेश घेऊन मी देशभर काम करणार आहे," असा संकल्प त्यांनी यावेळी सोडला.आपल्या पक्षाच्या विस्तारा...

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

इमेज
धांदरफळ बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद; संगमनेर प्रति : तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव न ठरता सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरला. स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आरोग्य व प्रशासकीय शिबिरांनी या वाढदिवसाला अनोखी उंची प्राप्त करून दिली. बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे ...

आ. सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाबाबत अधिवेशनात मांडला प्रश्न

इमेज
आ सत्यजित तांबे यांचा सरळ मार्गासाठी लढा सुरू संगमनेर (प्रतिनिधी)--लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सर्वांना सोयीचा व नैसर्गिकरित्या  सरळ मार्गे निश्चित झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मार्ग बदलण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ही हाय स्पीड रेल्वे सरळ मार्गे व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे.मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी ही मागणी केली यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. नामदार राम शिंदे हे होते.रेल्वे प्रश्नाबाबत मागणी करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे व्हावी ही अनेक दिवसापासून ची मागणी आहे. मात्र नियोजित मार्ग ऐवजी केंद्रसरकारकडून मार्ग बदलण्याचा निर्णय झाला. ही रेल्वे महारेल कडून आता ती सेंट्रल रेल्वेकडे गेली म्हणून या रेल्वेचा राज्य सरकारची संबंध आहे. सेंट्रल रेल्वेकडे हे काम...

‘अभंग रिपोस्ट’ने घडविली पंढरीची वारी; संगमनेर मर्चन्ट्सच्या ‘प्रेरणा दिना’चा शुभारंभ

इमेज
 सहकाराची ताकद विश्वासामध्ये - राजेश मालपाणी ; संगमनेर, प्रति; सहकाराची खरी ताकद विश्वासामध्ये आहे. या अद्भुत शक्तीच्या बळावरच संगमनेर मर्चंट बँकेने सातत्यपूर्ण प्रगतीची दिमाखदार साठवर्ष पूर्ण केली आहेत, असा विश्वास संगमनेर मर्चंट बँकेचे चेअरमन राजेश मालपाणी यांनी व्यक्त केला. मर्चन्ट्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष व संगमनेरचे भूषण उद्योगपती स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेल्या तीन दिवसीय ‘प्रेरणा दिन’ उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ.मैथिली तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ललितादेवी मालपाणी, व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर, प्रकल्प समितीचे अध्यक्ष प्रकाश कलंत्री, तज्ञ संचालक सीए.संजय राठी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई आदी उपस्थित होते, यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, साठ वर्षांपूर्वी बँकेच्या स्थापनेच्या वेळचे चित्र वेगळे होते. मात्र काळ कितीही बदलला तरीही सचोटी, पारदर्शकता, काटकसर, ग्राहकाभिमुखता ही तत्वे बदलत नाहीत. त्यांचे महत्त्व कायम आहे. संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांनी या तत्...

चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष बॅनर चे उद्घाटन डॉ भानुदास डेरे फाउंडेशन कॅम्पस मध्ये संपन्न

इमेज
प्रसिद्ध अभिनेते (मुळशी पॅटर्न फेम) प्रवीण तरडे यांच्या हस्ते डेरे फाउंडेशनमध्ये 'शिवजयंती' बॅनरचे दिमाखदार उद्घाटन.. संगमनेर: प्रतिनिधी संगमनेर येथील डॉ. भानुदास डेरे फाउंडेशन कॅम्पसमध्ये काल १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीणजी तरडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' उत्सवाच्या विशेष बॅनरचे उद्घाटन प्रवीण तरडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. श्रीराजजी डेरे आणि सेक्रेटरी डॉ. भानुदासजी डेरे यांनी प्रवीणजी तरडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन ढोल-ताशा वाजवत, लेझिम नृत्याने जंगी स्वागत केले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. अंकिता श्रीराज डेरे, प्राचार्य डॉ. सौ. सोनल निलेश डेरे आणि डॉ. निलेश विश्वनाथ डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.बॅनरच्या अनावरणानंतर प्रवीण तरडे यांनी कॅम्पस मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करताना त्यांनी छत्रपती शिवर...

अ. भा. सह्याद्री छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

इमेज
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संगमनेरमध्ये शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन अ . भा. सह्याद्री छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांची माहिती संगमनेर येथे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छावा संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांनी दिली आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी संगमनेर मध्ये अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री व क्रीडा प्रेमी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते ८.३० अभिवादन कार्यक्रम, ८.३० वा. महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. सदर शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन संगमनेर बस स्थानकजवळ, नवीन नगर रोड कॉर्नर येथे संपन्न होणार आहे....

जाणता राजा" संसारी कितीक,असती नाती गोती बहिणभाऊ, मोलाची माणिक मोती

इमेज
 जाणता राजा" संसारी कितीक,असती नाती गोती बहिणभाऊ, मोलाची माणिक मोती महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतीक, सामाजिक,राजकीय चळवळीत जे अनेक परिवार पिढ्यान पिढया त्याच सातत्याने समाजात काम करतात त्यात थोरात पाटील हा एक नावाजलेला परिवार आहे  पिढ्यान पिढया कष्टाळू वृत्ती, सर्वधर्म समभावाची वागणुक, नेतृत्व गुण, पुरोगामी विचार दूरदृष्टी, अध्यात्मिकता असे सर्व गुणसंपन्न असा हा परिवार आहे उत्तम नेतृत्व घडते त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात नेतृत्व एक दिवसात घडत नाही     अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील “ जोर्वे ” हे एक ऐतिहासिक गाव. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारी अमृतवाहिनी “ प्रवरा ” नदीच्या तीरावर वसलेले हे एक संपन्न गाव. नदीच्या काठावर प्रसिध्द एकमुखी दत्ताचे मंदिर, पुरातन काळातील कथा असलेले, सर्वांची श्रध्दा असलेले धार्मिकस्थळ. ऐतिहासिक संस्कृती असणारे “जोर्वे” संस्कृती म्हणून दिल्लीच्या संग्रहालयात असणारे हे प्रसिद्ध गाव थोरात पाटील परिवाराची परंपराच वेगळीच. हे आमचे पंजोबा गंगाराम पाटील थोरात हे गावचे पाटील व पंजी मंजुळाबाई थोरात अर्थात गावची पाटलीण. त्यां...

​संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; दिनेश फटांगरेवर सलग दुसरी कारवाई

इमेज
​ ​संपादक किसन भाऊ हासे यांची बदनामी आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई; विकृत पोस्टमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संताप ; ​​संगमनेर दि, 30 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या दिनेश फटांगरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'दैनिक युवावार्ता'चे संपादक किसन भाऊ हासे यांच्याबद्दल अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी, संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत (महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम २०१७) पहिला ऐतिहासिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी 'दैनिक युवावार्ता'ने प्रसिद्ध केली होती. याचा राग धरून शिवसेना (शिंदे गट) माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने फेसबुकवर संपादक किसन भाऊ हासे यांच्याविरोधात अतिशय गलिच्छ आणि अश्लील पोस्ट केली. समाजात वृत्तपत्राची आणि संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्याने केला. यापूर्वीही त्याने अनेकवेळा धमकीवजा पोस्ट केल्या होत्या, मात्र २९ जानेवारी...

अतिक्रमण निर्मूलन: शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी एका नवीन व्यापक धोरणास मंजुरी देण्यात आली आहे

इमेज
  संगमनेर नगरपरिषदेचे ऐतिहासिक पाऊल; शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १० महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब संगमनेर: प्रतिनिधी शहराच्या शिस्तीसाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेर नगरपरिषदेने डॉ. मैथिली तांबे (नगराध्यक्षा) यांच्या नेतृत्वाखाली २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण निर्मूलन, सौर ऊर्जा प्रकल्प आणि प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला आहे. प्रशासकीय सुधारणा आणि पारदर्शकता नगरपरिषदेचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेसोबत करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही संस्था प्रशासनातील अकार्यक्षमता दूर करण्यासाठी आराखडा तयार करणार आहे. तसेच, 'संगमनेर २.०' च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिस्त आणि शहर नियोजन अतिक्रमण निर्मूलन: शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी एका नवीन व्यापक धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. बॅनर्सवर निर्बंध: उच्च न्यायालयाच्या (PIL 155/2011) ...

राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा

इमेज
 राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा !  संगमनेर प्रतिनिधी या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवाला नव्हे तर जीवाला या जगाचा कधी ना कधी निरोप घ्यावाच लागतो जगाचा निरोप घेताना आपले सत्कर्मचांगली कामे जनमानसातील आपुलकीपणा आपल्या सोबत येतो असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख आधारस्तंभजोगिंदर शेठ हंसराज राजपाल आपल्या सर्वातून निघून गेले यामुळे राजपाल परिवार पोरका झाला आहे मित्रपरिवार दुःखाच्या छायेत आहे जोगिंदर शेठ यांनी आपल्या आयुष्यभर सतत चांगलेच कामे केली कोणाचेही मन दुखावले नाही पंजाबी समाजात ते सर्व मान्य असे व्यक्तिमत्व होते म्हणूनच त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेरसह -अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात कापड व्यावसायातील अग्रेसर असणा-याराजपालउद्योगसमुहाचे संस्थापक संचालक तसेच पवन राजपाल, मुकेश राजपाल आणि बंटी राजपाल यांचे मोठे भाऊ आणि सोनु राजपाल व हितेश राजपाल यांचे वडील जोगिंदरलाल हंसराज राजपाल यांचे आज सोमवार ता. १९ जानेवारी रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. त्...

जनसेवा फाऊंडेशने साकूर गटातील २१ बचतगटांना केले ७३ लाखाचे साहित्य वाटप

इमेज
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते वितरण.इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनच्या मार्फत प्रत्येकी एका बचत गटाला ३ लाख ५०हजार रुपये साहित्याची किट आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ  निलम खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साकूर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, खांबेचे सरपंच रविंद्र दातीर, सोनम कुडेकर, अमृता कोळपकर, भारत मुठे, सुनिता खेमनर, सुभाष पेंडभाजे, जनसेवा फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे, किरण पठारे, तेजेस गुळवे, निता कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होते .  साकूर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांना सक्षम करण्या साठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील यांनी विडा उचलला आहे. तसेच बचत गटांना व्यावसाय उभारण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रभागातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांच्या प्रचार निमित्त प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या प्रभागातील विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याच वेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याबरोबर कार्यकर्ते प्रभागातील युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने या प्रचारादरम्यान मोठे ताकतीने प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले होते  नागरिकांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना वाढता पाठिंबा व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळत होता या प्रचार रॅलीचे शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व युवक वर्ग महिला बंधू भगिनी व प्रभागातील माता भगिनी या प्रभागांमध्ये हिरीरीने घरटूघर प्रचार करत होते

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक सात मध्ये आघाडीवर

इमेज
संगमनेर मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निवडणूक प्रचार दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार यांनी आज प्रचारादरम्यान प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व आपली सेवा करण्याची संधी द्यावी व त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावेळी त्यांनी जाणून घेतले यावेळी प्रभागातील सर्व माता भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यात सहभागी झाला होता