श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य शोभा यात्रेचे आयोजन
संगमनेर/ प्रति : हनुमान जन्मोत्सव निमित्त शहरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोष म्हणून वातावरणात हा उत्सव साजरा होत असतो यातच संगमनेर शहराच्या केंद्रबिंदूस्थानी असलेले संकट मोचन हनुमान उत्सव समिती संगमनेर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते व त्याचबरोबर विविध कार्यक्रमांनी हा जन्मोत्सव सोहळा आनंद उत्सव पार पडत असतो या निमित्ताने आज सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या शोभा यात्रेचे प्रारंभ संगमनेर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणावरून शोभायात्रेची सुरुवात होणारा असून ती शहरातील विविध भागांतून शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेचे निघणाऱ्या मार्गावरून सर्वच भाविक भक्त यानिमित्ताने स्वागत करीत असतात फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टी इतर विविध प्रकारच्या प्रमुख आकर्षणांनी ही शोभायात्रा संपन्न होत असते.
शोभायात्रा संगमनेर शहर पोलीस स्टेशन संकट मोचन हनुमान मंदिर येथून शोभायात्रेची प्रारंभ होणार आहे.संजय गांधी नगर, नेहरू गार्डन, माळीवाडा, चावडी, अशोक चौक, मोमीनपुरा मार्गे लोकमान्य रोड येथे समाप्त होणार असून या शोभायात्रेत आपण उपस्थित राहून या शोभायात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शनिवारी 4 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा देखील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा