स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले.
'स्व. कुसुमताई भीमराव पवार' यांचे वर्षश्रध्द ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तनाने संपन्न
संगमनेर प्रति : "तू माऊली मवाळ, तू पाण्याहून पातळ..." या संतवचनाप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर वात्सल्याचा वर्षाव केला, अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या मातोश्री स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांच्या कीर्तन सेवेने वर्षश्राद्धाचे विधी संपन्न झाले.
-----------रस्त्याचे नामकरण आणि श्रद्धांजली------------
एक वर्षापूर्वी कुसुमताईंचे निधन झाल्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी गुंजाळवाडी येथील रस्त्याला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या नामकरण सोहळ्यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी कुसुमताईंच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि सामाजिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला.
----------भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवा----------
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विनोद महाराज राऊत यांची कीर्तन सेवा झाली. आपल्या निरूपणातून त्यांनी आईचे महत्त्व आणि 'माऊली' या शब्दाची व्याप्ती विशद केली. "आईचे जाणे ही कधीही न भरून येणारी पोकळी आहे, मात्र तिचे संस्कारच कुटुंबाला पुढे घेऊन जातात," असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
जाहिरात
पवार कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी आणि श्रद्धांजली सभेला विविध राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी एस आर उद्योग समूहाचे संचालक आबासाहेब थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव शिंदे,नवले उद्योग समूहाचे साहेबराव नवले,आमदार सत्यजित दादा तांबे,नगरसेवक सौरभ कासार,सरपंच अमोल (नरेंद्र) गुंजाळ,माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे,सौ नीलम ताई खताळ,कपिल पवार ,श्रीराम पवार,नवनाथ अरगडे ,रमेश गुंजाळ,देवराज थोरात , जालिंदर वाकचौरे,कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ गोडसे ,कॉन्ट्रॅक्टर k k थोरात,सुभाष रहाणे ,गौरव डोंगरे ,अनिकेत कडलग,व्यंकटेश देशमुख ,मारुती शिंदे अशोक गुंजाळ ,सचिन पानसरे राजूशेठ पंजाबी ,प्रवीण अभंग बाळासाहेब गुंजाळ ,सतीश दुरुगडे ,संजय गोरडे सर,रोहन गोफणे नामफलकाचे अनावरण यांसह तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गुंजाळवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा