​संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; दिनेश फटांगरेवर सलग दुसरी कारवाई

​संपादक किसन भाऊ हासे यांची बदनामी आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई; विकृत पोस्टमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संताप;


​​संगमनेर दि, 30 जानेवारी 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या दिनेश फटांगरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'दैनिक युवावार्ता'चे संपादक किसन भाऊ हासे यांच्याबद्दल अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी, संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत (महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम २०१७) पहिला ऐतिहासिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी 'दैनिक युवावार्ता'ने प्रसिद्ध केली होती. याचा राग धरून शिवसेना (शिंदे गट) माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने फेसबुकवर संपादक किसन भाऊ हासे यांच्याविरोधात अतिशय गलिच्छ आणि अश्लील पोस्ट केली. समाजात वृत्तपत्राची आणि संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्याने केला. यापूर्वीही त्याने अनेकवेळा धमकीवजा पोस्ट केल्या होत्या, मात्र २९ जानेवारी २०२६ रोजी त्याने अश्लीलतेचा कळस गाठल्याने पत्रकार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला.
​कायदेशीर कारवाईचा बडगा
​विविध पत्रकार संघटना, सामाजिक संस्था आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेऊन पुरावे सादर केले. त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिनेश फटांगरेवर खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:पत्रकार संरक्षण कायदा २०१७: कलम ४भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३: कलम ३५१, ३५२, ३५३(१), ३५६(१) आमदार सत्यजित तांबे यांच्यावरही गलिच्छ टीका फटांगरे एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने विधानपरिषद आमदार सत्यजित तांबे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांत सलग तीन गुन्हे दाखल होऊनही आरोपी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.आमदार अमोल खताळ यांनी वारंवार समज देऊनही फटांगरेच्या वागण्यात बदल झाला नाही. शिवसेनेने त्याची पदावरून हकालपट्टी केली असली, तरी त्याला पक्षातूनही कायमचे काढण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

​प्रतिक्रिया: हा केवळ एका वृत्तपत्राचा नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे. अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचणे गरजेचे आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी परत वरील कलमान्वये गुन्हा दाखल केला असून यावेळी किसन भाऊ हासे (संस्थापक, दैनिक युवावार्ता)
अँडव्होकेट संग्राम जोंधळे ,श्याम तिवारी,अमोल मतकर,भारत रेघाटे , सोमनाथ काळे, अनंत पांगरकर,शौकत पठाण ,जमीर शेख,आनंद बनभेरू, सचिन जंत्रे,संजय अहिरे ,सतीश आहेर, सलीम शेख इतर सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रिंट मीडिया न्यूज चॅनेल चे संपादक प्रतिनिधी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ