आमदार अमोल खताळ यांची विधान सभेत जोरदार मागणी
संगमनेर प्रति:संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड किल्ल्या च्या संवर्धनासाठी राज्य शासनाने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्यात यावा,तसेच संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये २८ ऑगस्ट हा दिवस “हिंदवी स्वराज्य संकल्प दिन” म्हणून साजरा करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी राज्याच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड) ऐतिहासिक दुर्गाचे पुरेसे जतन व संवर्धन होत नसल्याने हा अमूल्य वारसा दुर्लक्षित अवस्थेत आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन न झाल्यास या ऐतिहासिक ठेव्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. शहागडाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा,अशी मागणी करताना पुरातत्व, सांस्कृतिक आणि पर्यटन विभागांनी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्या दुर्गाचे संवर्धन करावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करून या स्थळाला ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

पेमगिरी येथील शहागडाच्या इतिहासाबद्दल स्थानिक नागरिकांत जागरूकता निर्माण होईल तसेच पर्यटन वाढून परिसरा च्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या इतिहासाची आणि स्वराज्याच्या प्रेरणेची ही पवित्र भूमी जपणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सरकारने या प्रमुख मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे ही आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा