अ. भा. सह्याद्री छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संगमनेरमध्ये शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

. भा. सह्याद्री छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष प्रवीण कानवडे यांची माहिती
संगमनेर येथे अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छावा संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांनी दिली आहे.
सालाबादप्रमाणे याही वर्षी संगमनेर मध्ये अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री व क्रीडा प्रेमी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते ८.३० अभिवादन कार्यक्रम, ८.३० वा. महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. सदर शिव जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन संगमनेर बस स्थानकजवळ, नवीन नगर रोड कॉर्नर येथे संपन्न होणार आहे. तरी या शिव जन्मोत्सव सोहळ्यात शिव भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री. प्रविण कानवडे यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

स्व. कुसुमताई भीमराव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुंजाळवाडी येथील मुख्य रस्त्याचे नामकरण करण्यात आले.

श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन