राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा
राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा !
संगमनेर प्रतिनिधी
या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवाला नव्हे तर जीवाला या जगाचा कधी ना कधी निरोप घ्यावाच लागतो जगाचा निरोप घेताना आपले सत्कर्मचांगली कामे जनमानसातील आपुलकीपणा आपल्या सोबत येतो असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख आधारस्तंभजोगिंदर शेठ हंसराज राजपाल आपल्या सर्वातून निघून गेले यामुळे राजपाल परिवार पोरका झाला आहे मित्रपरिवार दुःखाच्या छायेत आहे जोगिंदर शेठ यांनी आपल्या आयुष्यभर सतत चांगलेच कामे केली कोणाचेही मन दुखावले नाही पंजाबी समाजात ते सर्व मान्य असे व्यक्तिमत्व होते म्हणूनच त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेरसह -अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात कापड व्यावसायातील अग्रेसर असणा-याराजपालउद्योगसमुहाचे संस्थापक संचालक तसेच पवन राजपाल, मुकेश राजपाल आणि बंटी राजपाल यांचे मोठे भाऊ आणि सोनु राजपाल व हितेश राजपाल यांचे वडील जोगिंदरलाल हंसराज राजपाल यांचे आज सोमवार ता. १९ जानेवारी रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजपाल परिवारावावर शोककळा पसरली आहे.
स्व. जोगिंदरलाल राजपाल यांचे
वडील अनेक वर्षांपूर्वी संगमनेर शहरातव्यवसायानिमित्तस्थायिक झाले. पुढे स्व. जोगिंदरलाल राजपाल यांनी आठवडे
बाजार करून कपडे विकण्याचे काम केले. हळूहळू व्यवसायात जम बसवला व पुढे संगमनेर शहरात राजपाल क्लॉथ (कापड) हे बॅण्ड तयार झाले. आज केवळ संगमनेरातच नव्हे तर अहिल्या नगर, नारायणगाव, श्रीरामपूर या मोठ्या शहरांमध्ये राजपाल क्लॉथच्या शाखा आहेत. अतिशय मेहनतीने राजपाल परिवाराने हा व्यवसाय वाढवला. या व्यवसायाचे आधारस्तंभ असणारे जोगिंदरलाल राजपाल हरवल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे
स्वर्गीय जोगिंदर शेठ राजपाल यांच्यावर आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पंजाबी समाज बांधवांसह सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जोगिंदर शेठ राजपाल है गंगामाई परिवाराचे सदस्य होते सतत हसतमुख शांत व संयमी असा त्यांचा स्वभाव होता मित्रांचे ते मित्रहोते त्यांच्या जाण्याने गंगामाई परिवार हळूहळू ला गेला तर राजपाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असा मित्र असा पिता होणे नव्हे अशा प्रतिक्रिया मित्र परिवारातून उमटत होत्या खरोखरच जोगिंदर शेठ राजपाल हे अत्यंत शांत स्वभावाचे होते त्यांच्या
राजपाल परिवाराचे छत्र हरपले
संगमनेर येथील सुप्रसिद्ध राजपाल कापड उद्योग व्यवसायाचे प्रमुख असलेले जोगिंदर राजपाल यांच्या जाण्याने राजपालपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे जोगिंदर शेठ राजपाल है एक अत्यंत शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते गंगामाई परिवाराचे ते सदस्य होते योगा व प्राणायाम क्लासचे ते सदस्य होते दररोज नियमितपणे प्राणायाम योगा करणारे जोगिंदर शेठ ठणठणीत होते मात्र त्यांना बीपी व शुगर यांचा मोठा त्रास होता मुलगा सोनू याने त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार केले मात्र नशिबाने साथ दिली नाही व राजपाल परिवार आज पोरका झाला तर गंगामाई परिवारावरही दुःखाची छाया पसरली गेली आहे जोगिंदर शेठ यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
चेह-यावर कधीही राग दिसला नाही असा हा मित्र आपल्यातून गेल्यामुळे ती उणीव कधीही भरून निघणार नाही एवढे मात्र खरे
अशा या सर्वांचे आवडते असलेले
जोगिंदर राजपाल यांना राजपाल परिवार आप्तेष्ट मित्र परिवार गंगामाई परिवार व सर्व मित्र परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा