सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

धांदरफळ बुद्रुक येथे विविध सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद;


संगमनेर प्रति :तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील भूमिपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब भास्करराव देशमाने यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा वर्षाव न ठरता सामाजिक उत्तरदायित्वाचा सोहळा ठरला. स्वदेश युवा प्रतिष्ठान, स्वदेश सामाजिक सेवाभावी संस्था आणि ग्रामपंचायत धांदरफळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध आरोग्य व प्रशासकीय शिबिरांनी या वाढदिवसाला अनोखी उंची प्राप्त करून दिली.

बाळासाहेब देशमाने हे नेहमीच ग्रामविकास आणि धार्मिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आले. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या मोहिमेअंतर्गत रोटरी आय केअर ट्रस्टच्या सहकार्याने ७५ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रोटरी आय केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारांचे मार्गदर्शन व निवड करण्यात आली. देशातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, अर्पण रक्तपेढीच्या माध्यमातून तरुण युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून श्री. देशमाने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. धांदरफळ आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेतील १०४ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. संगमनेर येथील संग्राम निवास मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व अन्नदान करून देशमाने यांनी आपली सामाजिक संवेदनशीलता जपली. ग्रामप्रशासनाला आधुनिकतेची जोड देत यावेळी 'ई-रेशन कार्ड' आणि ग्रामपंचायत मालमत्तेची माहिती देणाऱ्या 'क्यूआर कोड' (QR Code) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 

यामुळे ग्रामस्थांना घरबसल्या पाणीपुरवठा कर पावती आणि शासकीय योजनांची माहिती मिळणे सोपे होणार आहे. तसेच, साई समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून ५५ ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमधील चुकांची दुरुस्ती करण्यात आली. 'हिंद दी चादर' उपक्रमांतर्गत श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान ते श्री क्षेत्र देहू येथे जाणाऱ्या बीज यात्रा पालखी सोहळ्यातील भाविकांनी सामाजिक एकता, बंधुता आणि सहिष्णुतेचा संदेश दिला.त्याचबरोबर ​स्वदेश उद्योग समूहातील समीर परदेशी, योगेश देशमुख,  सतीश दुर्गुडे, गोपीनाथ नाईकवाडी, अमोल डेरे, सागर घोलप, अक्षय पानसरे, गंगाराम सातपुते, महेश देशमुख, रघु दिघे, निखिल सानप, निरंजन सातपुते, भारत घुले, अशोक सातपुते, सचिन पोकळे, नितेश जोशी,  संकेत करंजेकर यांच्या वतीने जीवदया गोशाळेसाठी चारा वाटप करण्यात आले. यावेळी गोशाळेचे व्यवस्थापक राजेश दोशी यांनी  सांगितले की, उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या टंचाईच्या काळात स्वदेश परिवार नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. तर स्वयंप्रेरित संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार यांनी मूकबधिर विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, हा वाढदिवस म्हणजे माणुसकीचे दर्शन घडवणारा सोहळा असल्याचे म्हटले.

या कार्यक्रमाला स्वदेश युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, मोहन देशमाने, सचिन देशमाने, अविनाश देशमुख, राजेश शिंदे, किरण वाकचौरे, रोहन बनकर, दत्ता कासार, रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुनील देशमुख, माजी सभापती अनिल देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी काळे, सरपंच सौ. उज्वला नवनाथ देशमाने, ग्रामविकास अधिकारी सुरेश मंडलिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. सुप्रिया तोरकडी, डॉ. गौरव देवळे, संदीप घुले, नितीन कढणे, सुजाता वाकचौरे व त्यांच्या टीमने या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या 'लोकाभिमुख' उपक्रमांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ