जनसेवा फाऊंडेशने साकूर गटातील २१ बचतगटांना केले ७३ लाखाचे साहित्य वाटप


आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते वितरण.इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश





संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनच्या मार्फत प्रत्येकी एका बचत गटाला ३ लाख ५०हजार रुपये साहित्याची किट आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ  निलम खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साकूर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, खांबेचे सरपंच रविंद्र दातीर, सोनम कुडेकर, अमृता कोळपकर, भारत मुठे, सुनिता खेमनर, सुभाष पेंडभाजे, जनसेवा फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे, किरण पठारे, तेजेस गुळवे, निता कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होतेसाकूर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांना सक्षम करण्या साठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील यांनी विडा उचलला आहे. तसेच बचत गटांना व्यावसाय उभारण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख ५० हजार रुपयांच्या साहित्याची किट वाटप करण्यात आली. या किटमध्ये दोन पिठाच्या गिरण्या, दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश होता. या किटचा महिला बचत गटांना  फायदा होणार असल्याचे सौ खताळ यांनी सांगितले यावेळी सर्व महिला बचत गटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.............................चौकट.............................
      केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी  अनेक योजना आहे त्या योजनांचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा . महिलांनी कधीच स्वतःला कमी लेखू नये. तर एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण करावी महिलांमध्ये विविध गुण आहे ते गुण आत्मसात करा आणि मिळालेल्या संधीच सोन करा
सौ नीलम खताळ 
सामाजिक कार्यकर्त्या
...............................................................

  ...........................चौकट..........................
     येथून पाठीमागच्या सरकारच्या काळात महिला बचत गटांना कधीच साहित्य मिळत नव्हते, मात्र आता महायुती सरकारच्या काळात पालक मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पा यांच्या अथक प्रयत्नातून २१ बचत गटांना जवळपास ७३ लाख ५० हजार रूपायांचे किट वाटप करण्यात आले. बचत गटांना साहित्य मिळू लागल्या मुळे विरोधकांची जळजळ सुरूझाली आहे. गेली ४० वर्ष संगमनेरसहपठार भागातील महिला बचत गटांकडे लक्ष दिले नाही, मात्र कार्यक्रमासला की महिला बचत गटांचा फक्त वापर विरोधकांनी केला ' श्री गुलाब भोसले
 अध्यक्ष भाजपा संगमनेर
....................
..............चौकट.............................

 .साकूर गटात आजपर्यंत बचत गटांना कधीच निधी, साहित्य भेटले नाहीत. ते फक्त जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून मिळायला सुरुवात झाली आहे. कारण विरोधकांनी ४० वर्ष फक्त महिलांचा मतदानासाठी वापर केला आहे. मात्र इथून पुढे एकही बचतगट वंचित राहणार नाही' श्री रविंद्र दातीर
      सरपंच खांबे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ