चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष बॅनर चे उद्घाटन डॉ भानुदास डेरे फाउंडेशन कॅम्पस मध्ये संपन्न

प्रसिद्ध अभिनेते (मुळशी पॅटर्न फेम) प्रवीण तरडे यांच्या हस्ते डेरे फाउंडेशनमध्ये 'शिवजयंती' बॅनरचे दिमाखदार उद्घाटन..

संगमनेर: प्रतिनिधी
संगमनेर येथील डॉ. भानुदास डेरे फाउंडेशन कॅम्पसमध्ये काल १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीणजी तरडे यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' उत्सवाच्या विशेष बॅनरचे उद्घाटन प्रवीण तरडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले.

या सोहळ्याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. श्रीराजजी डेरे आणि सेक्रेटरी डॉ. भानुदासजी डेरे यांनी प्रवीणजी तरडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन ढोल-ताशा वाजवत, लेझिम नृत्याने जंगी स्वागत केले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. अंकिता श्रीराज डेरे, प्राचार्य डॉ. सौ. सोनल निलेश डेरे आणि डॉ. निलेश विश्वनाथ डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.बॅनरच्या अनावरणानंतर प्रवीण तरडे यांनी कॅम्पस मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करताना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. 

"शिक्षण घेतानाच आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगा," असे मोलाचे विचार त्यांनी यावेळी मांडले.
डेरे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे तसेच कॅम्पस मधील निसर्गरम्य वातावरणाचे प्रवीण तरडे यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटता आल्याने आणि त्यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ झाल्याने संपूर्ण कॅम्पसमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरमध्ये ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ — कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

सामाजिक बांधिलकीतून उद्योजक बाळासाहेब देशमाने यांचा वाढदिवस साजरा

रस्त्यांसाठी ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर- आ. खताळ