पोस्ट्स

​संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; दिनेश फटांगरेवर सलग दुसरी कारवाई

इमेज
​ ​संपादक किसन भाऊ हासे यांची बदनामी आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई; विकृत पोस्टमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संताप ; ​​संगमनेर दि, 30 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या दिनेश फटांगरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'दैनिक युवावार्ता'चे संपादक किसन भाऊ हासे यांच्याबद्दल अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी, संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत (महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम २०१७) पहिला ऐतिहासिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.​उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी 'दैनिक युवावार्ता'ने प्रसिद्ध केली होती. याचा राग धरून शिवसेना (शिंदे गट) माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने फेसबुकवर संपादक किसन भाऊ हासे यांच्याविरोधात अतिशय गलिच्छ आणि अश्लील पोस्ट केली. समाजात वृत्तपत्राची आणि संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्याने केला. यापूर्वीही त्याने अनेकवेळा धमकीवजा पोस्ट केल्या होत्या, मात्र २९ जानेवारी...

अतिक्रमण निर्मूलन: शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी एका नवीन व्यापक धोरणास मंजुरी देण्यात आली आहे

इमेज
  संगमनेर नगरपरिषदेचे ऐतिहासिक पाऊल; शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १० महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब संगमनेर: प्रतिनिधी शहराच्या शिस्तीसाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी संगमनेर नगरपरिषदेने डॉ. मैथिली तांबे (नगराध्यक्षा) यांच्या नेतृत्वाखाली २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण निर्मूलन, सौर ऊर्जा प्रकल्प आणि प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यात आला आहे. प्रशासकीय सुधारणा आणि पारदर्शकता नगरपरिषदेचे प्रशासन अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेसोबत करार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही संस्था प्रशासनातील अकार्यक्षमता दूर करण्यासाठी आराखडा तयार करणार आहे. तसेच, 'संगमनेर २.०' च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिस्त आणि शहर नियोजन अतिक्रमण निर्मूलन: शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी एका नवीन व्यापक धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. बॅनर्सवर निर्बंध: उच्च न्यायालयाच्या (PIL 155/2011) ...

राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा

इमेज
 राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदर हंसराज राजपाल यांच्या निधनाने शोककळा !  संगमनेर प्रतिनिधी या जगात जन्म घेतलेल्या प्रत्येक मानवाला नव्हे तर जीवाला या जगाचा कधी ना कधी निरोप घ्यावाच लागतो जगाचा निरोप घेताना आपले सत्कर्मचांगली कामे जनमानसातील आपुलकीपणा आपल्या सोबत येतो असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख आधारस्तंभजोगिंदर शेठ हंसराज राजपाल आपल्या सर्वातून निघून गेले यामुळे राजपाल परिवार पोरका झाला आहे मित्रपरिवार दुःखाच्या छायेत आहे जोगिंदर शेठ यांनी आपल्या आयुष्यभर सतत चांगलेच कामे केली कोणाचेही मन दुखावले नाही पंजाबी समाजात ते सर्व मान्य असे व्यक्तिमत्व होते म्हणूनच त्यांच्या जाण्याने सर्वांनाच धक्का पोहोचला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेरसह -अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात कापड व्यावसायातील अग्रेसर असणा-याराजपालउद्योगसमुहाचे संस्थापक संचालक तसेच पवन राजपाल, मुकेश राजपाल आणि बंटी राजपाल यांचे मोठे भाऊ आणि सोनु राजपाल व हितेश राजपाल यांचे वडील जोगिंदरलाल हंसराज राजपाल यांचे आज सोमवार ता. १९ जानेवारी रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते ७५ वर्षांचे होते. त्...

जनसेवा फाऊंडेशने साकूर गटातील २१ बचतगटांना केले ७३ लाखाचे साहित्य वाटप

इमेज
आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलम खताळ यांच्या हस्ते वितरण.इलेक्ट्रॉनिक वजन काटे, पनोलायझर, दोन पॅकिंग मशीनचा समावेश संगमनेर प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील २१ महिला बचत गटांना जनसेवा फाऊंडेशनच्या मार्फत प्रत्येकी एका बचत गटाला ३ लाख ५०हजार रुपये साहित्याची किट आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ  निलम खताळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साकूर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात बचत गटांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, खांबेचे सरपंच रविंद्र दातीर, सोनम कुडेकर, अमृता कोळपकर, भारत मुठे, सुनिता खेमनर, सुभाष पेंडभाजे, जनसेवा फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी रूपाली लोंढे, किरण पठारे, तेजेस गुळवे, निता कांदळकर आदि मान्यवर उपस्थित होते .  साकूर जिल्हा परिषद गटातील महिला बचत गटांना सक्षम करण्या साठी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील यांनी विडा उचलला आहे. तसेच बचत गटांना व्यावसाय उभारण्यासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक बचत गटाला ३ लाख...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना प्रभागातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
संगमनेर नगरपालिका निवडणूक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांच्या प्रचार निमित्त प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या प्रभागातील विविध भागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे याच वेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्याबरोबर कार्यकर्ते प्रभागातील युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने या प्रचारादरम्यान मोठे ताकतीने प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरले होते  नागरिकांकडून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना वाढता पाठिंबा व जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळत होता या प्रचार रॅलीचे शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व युवक वर्ग महिला बंधू भगिनी व प्रभागातील माता भगिनी या प्रभागांमध्ये हिरीरीने घरटूघर प्रचार करत होते

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक सात मध्ये आघाडीवर

इमेज
संगमनेर मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निवडणूक प्रचार दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार यांनी आज प्रचारादरम्यान प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व आपली सेवा करण्याची संधी द्यावी व त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावेळी त्यांनी जाणून घेतले यावेळी प्रभागातील सर्व माता भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यात सहभागी झाला होता

गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांचा सत्कार

इमेज
बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले.                                 येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.