आ. सत्यजित तांबे यांनी नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाबाबत अधिवेशनात मांडला प्रश्न
आ सत्यजित तांबे यांचा सरळ मार्गासाठी लढा सुरू संगमनेर (प्रतिनिधी)--लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे सर्वांना सोयीचा व नैसर्गिकरित्या सरळ मार्गे निश्चित झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मार्ग बदलण्याबाबत संभ्रम निर्माण झाला असून ही हाय स्पीड रेल्वे सरळ मार्गे व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला आहे.मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी ही मागणी केली यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ मंत्री उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. नामदार राम शिंदे हे होते.रेल्वे प्रश्नाबाबत मागणी करताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नाशिक पुणे रेल्वे व्हावी ही अनेक दिवसापासून ची मागणी आहे. मात्र नियोजित मार्ग ऐवजी केंद्रसरकारकडून मार्ग बदलण्याचा निर्णय झाला. ही रेल्वे महारेल कडून आता ती सेंट्रल रेल्वेकडे गेली म्हणून या रेल्वेचा राज्य सरकारची संबंध आहे. सेंट्रल रेल्वेकडे हे काम...