संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल; दिनेश फटांगरेवर सलग दुसरी कारवाई
संपादक किसन भाऊ हासे यांची बदनामी आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई; विकृत पोस्टमुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संताप ; संगमनेर दि, 30 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अत्यंत खालच्या भाषेत पोस्ट टाकून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या दिनेश फटांगरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'दैनिक युवावार्ता'चे संपादक किसन भाऊ हासे यांच्याबद्दल अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी, संगमनेरमध्ये पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत (महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसारमाध्यम संस्था अधिनियम २०१७) पहिला ऐतिहासिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी 'दैनिक युवावार्ता'ने प्रसिद्ध केली होती. याचा राग धरून शिवसेना (शिंदे गट) माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने फेसबुकवर संपादक किसन भाऊ हासे यांच्याविरोधात अतिशय गलिच्छ आणि अश्लील पोस्ट केली. समाजात वृत्तपत्राची आणि संपादकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न त्याने केला. यापूर्वीही त्याने अनेकवेळा धमकीवजा पोस्ट केल्या होत्या, मात्र २९ जानेवारी...