पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळे पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद
पुणे/प्रति : पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “पत्रकार सुरक्षित तर लोकशाही मजबूत” हा संदेश देत ही चळवळ आता निर्णायक संघर्षाच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. संघटनात्मक बांधणीतून पुण्यात आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेची मोठी ताकद उभी राहिली आहे . देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेली ‘पत्रकार सुरक्षा परिषद’ अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक ठरली. पत्रकारांचे अधिकार, हक्क आणि बदलत्या मीडिया व्यवस्थेतील आव्हाने यांवर या परिषदेत सखोल मंथन करण्यात आले. राज्यभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभाग नोंदवत आपले...