पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार प्रभाग क्रमांक सात मध्ये आघाडीवर

इमेज
संगमनेर मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे निवडणूक प्रचार दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रसाद ज्ञानदेव गोरे उर्फ भाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार यांनी आज प्रचारादरम्यान प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला व आपली सेवा करण्याची संधी द्यावी व त्याचबरोबर त्यांचे विविध प्रश्न यावेळी त्यांनी जाणून घेतले यावेळी प्रभागातील सर्व माता भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने या प्रचार दौऱ्यात सहभागी झाला होता

गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांचा सत्कार

इमेज
बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले.                                 येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

इमेज
  श्रीरामपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. समाजातील विविध घटकांतील नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने वातावरण रंगले. त्यांच्या कलाकौशल्याने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यानिमित्ताने श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्ष संघटनेला निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.